ताक पिण्याचे 10 फायदे | 10 Benefits Of Drinking Buttermilk in Marathi.

नमस्कार मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहोत शास्त्रात अनन्य महत्व दिले आहे पण आपल्या सर्वांकडून कोठे ना कोठे या गोष्टीकडे होत असलेल्या दुर्लक्ष कडे. आपल्या शास्त्रात ज्याची तुलना साक्षात अमृताशी अशी केली आहे. मित्रांनो आपण बोलत आहोत ताक (Buttermilk) बद्दल. तर चला समजून घेऊ या. ताक पिण्याचे फायदे | Benefits Of Drinking Buttermilk in Marathi. चला तर मग सुरु करूया.

मित्रांनो आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला प्रत्येकाला आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ नाही. बदललेले हवामान, आहारातील चुका यामुळे कोठे ना कोठे आपल्याला नवीन नवीन आजाराचा सामना करावा लागतो. पण आपल्याच शास्त्राने आयुर्वेदाने आपल्याला आपल्या अशा काही गोष्टी दिल्या आहेत त्या आपल्यासाठी वरदान आहेत. पण त्याचं महत्त्व आपल्याला अजूनही ओळखता आलेलं नाही. जसे की ताक  (Buttermilk) आता ताक हे काही जंगलातून आणण्याची गरज नाही. हे आपल्याला आपल्या घरात, घराच्या आजूबाजूला किंवा मग आपल्या घरातही भेटू शकते. आणि इतक्या सहजतेने उपलब्ध होणाऱ्या ताकाचे फायदे…तुम्ही बघाच.

ताक पिण्याचे 10 फायदे | 10 Benefits Of Drinking Buttermilk in Marathi.

(1) दात येताना लहान मुलांना होणारा त्रास – आता मित्रांनो ताकाचा पहिला फायदा आपल्या सगळ्यांना माहितीच असेल. लहान बाळांना जेव्हा दात येऊ लागतात तेव्हा त्यांना प्रचंड प्रमाणात त्रास होत असतो. त्यामुळे बाळ रडणे, चिडचिड करते पण त्यांना होणारा त्रास ते कोणालाही सांगू शकत नाही. त्यावर उपाय त्यांना चार चमचे ताक दिवसभरातून दोन-तीन वेळेस द्यावे बिलकुल त्या बाळांना होणारा त्रास कमी होईल.

(2) तोंड येणे – मित्रांनो तोंड येण्याचा प्रकार आपण सगळ्यांनीच अनुभवलेला असेल. आणि त्याच्या वर काहीही खाल्ल्यावर तोंडात होणारी प्रचंड आग़ आपल्याला असहाय करून ठेवते. अशा परिस्थितीत आपण ताक किंवा दह्याचा पाण्याने जर गुळन्या केल्या तर आपल्याला फारच लवकर फरक दिसतो.

(3) पंचकर्म – मित्रांनो ताकाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शरीरात आपोआप होणारे  पंचकर्म. पण पंचकर्म घेणाऱ्या होण्यासाठी तुम्हाला एक काम करावे लागेल. तुम्हाला सलग तीन दिवस काही न खाता फक्त ताकावर राहावे लागेल. जर तुम्ही असं करण्यात यशस्वी झालात तर आपोआप तुमच्या शरीराचे पंचकर्म होऊन जाईल. बाहेर पैसे देऊन करून घेण्यापेक्षा एकदा घरच्या घरी करून बघा.

(4) लठ्ठपणा – मित्रांनो आपल्याला शरीरातील आळस किंवा वेळेची कमतरता असल्याने आपण व्यायाम, योगासने, मैदानी खेळा पासून दुरावत चाललो आहोत. आणि त्यात आहारातील अनियमितता यामुळे वजन वाढीचे प्रमाण सध्या खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आढळून येत आहे. त्यावर ही ताक एक चांगला उपाय आहे लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपण नियमितपणे ताकाचे सेवन करू शकतात.

(5) वारंवार लघवी होण्याचा त्रास – मित्रांनो आपल्याला ही अडचण बऱ्याच वेळेस आली असेल की सतत लघवी येणे आपण बऱ्याच वेळा अशा काही ठिकाणी असतो जिथे सतत लघवीला जाणे आपल्याला शक्य होत नाही. त्याच वेळेस आपण अडचणीत सापडतो त्यावरही ताक हा उपाय आहे. आपण ताकत मीठ मिसळून दिल्यास आपल्याला हा त्रास कमी होतो.

(6) लघवी करताना जळजळ – मित्रांनो लघवी करताना होणारी जळजळ ही फार भयानक त्रासदायक आहे. आणि हा त्रास आपण सगळेच अनुभवलेला आहे. आणि त्याच्यावर उपाय म्हणून तुम्ही ताकामध्ये गूळ मिसळून केल्यास तुम्हाला नक्की फरक जाणवेल.

(7) पोटातील जंतू – मित्रांनो खाण्याचे वाईट सवयी त्यात बाहेरचे उघड्यावरचे तेलकट-तुपकट पदार्थ सेवन करणे आपल्या शरीरासाठी धोकादायक आहे. त्यामुळे आपल्याला नाना प्रकारच्या व्याधी लागतात. त्यामुळे पोटात जंतू चे प्रमाणही वाढते आणि ते आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही. त्यावर उपाय असा आहे की आपण ताकात थोड्या प्रमाणात ओवा टाकावा. त्याने पोटातील सर्व जंतु तो मरून जातील.

(8) पित्ताचा त्रास – मित्रांनो पित्ताचे त्रास होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अन्नाचे चांगल्या पद्धतीने पचन न होणे त्यामुळे पित्ताचा त्रास, मळमळ असे प्रकार होतात तर यावर उपाय आहे ताका मध्ये साखर आणि काळी मिरी टाकून पिल्यास पित्ताचा त्रास कमी होतो.

(9) डोकेदुखी – मित्रांनो डोकेदुखी वर ह़ी ताक़ रामबाण उपाय आहे. पण आपल्याला सर्दी मुळे झालेली डोकेदुखी असल्यास आपण ताक़ पिने टाळावे. जर तुम्हाला साधी डोकेदुखी होत असेल. तर तुम्ही थोडीफार जायफळ पूड ताकात मिसळून घेतल्यास डोकेदुखी नक्की कमी होईल.

(10) पोटदुखी – मित्रांनो जेवनातील अनियमिता, तेलकट पदार्थांचे अति सेवन यामुळे होणारी पोटदुखी आजच्या जगण्यात फारच प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते. त्यावर ताक एक उपाय आहे. आपण ताक़ ज़र अनिषा पोटी घेतल तर आपल्याला 100% फरक जाणवतो.

 

Leave a Comment