Ashok Saraf Biography in Marathi | अशोक सराफ जीवन परिचय | Ashok Saraf Marathi

नमस्कार मित्रांनो, आज आपण माहिती जाणून घेणार आहोत मराठी चित्रपटसृष्टीतील एका अशा कलावंताच्या बाबतीत ज्याने सलग 50 वर्ष आपल्या विनोदी अभिनयाने आपल्या सर्वांचे मनोरंजन केले. त्यांनी मराठी चित्रपट सृष्टी सोबत हिंदी चित्रपटातील आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. आपल्याला आता लक्षात आले नसेल आम्ही बोलत आहोत मराठी चित्रपट सृष्टीतील मामा म्हणून परिचित असलेले विनोदी चित्रपटांचा काळ लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, महेश कोठारे यांच्यासमवेत गाजणारे महान कलाकार अशोक सराफ मराठी | Ashok Saraf Marathi यांच्याबद्दल. तर चला मग आज आपण जाणून घेऊया मामाच्या आयुष्यात बद्दल, अभिनय, करिअर, जिवनातील चढ़ उतारा बद्दल …चला तर मग सुरु करूया.

Ashok Saraf Family –

मित्रांनो, तर आता आपण जाणून घेऊया अशोक सराफ यांच्या बालपण आणि कुटुंबाविषयी तर अशोक सराफ (Ashok Saraf) यांचा जन्म 14 जून 1947 ला मुंबई इथे झाला. तसेच अशोक सराफ मूळचे बेळगावचे पण त्यांचे संपूर्ण बालपण मुंबईतील चिखलवाडी परिसरात गेले. अशोक सराफ यांचे वडील एक व्यवसायिक होते ती इलेक्ट्रिकल वस्तू विकण्याचा व्यवसाय करत होते.

आपल्याकडे म्हणतात ना “बाळाचे पाय पाळण्यात दिसतात” तसेच अशोक मामांना बालपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती. पण सर्वसामान्य मराठी कुटुंबाप्रमाणे आपल्या मुलाने चांगले शिक्षण घ्यावे व एखाद्या चांगल्या ठिकाणी नोकरी करावी अशी अपेक्षा त्यांच्या वडिलांची होती. पण अभिनयाचा मोह अशोक सराफ (Ashok Saraf) यांना काही आवरता येत नव्हता.

त्यांनी अवघ्या वयाच्या अठराव्या वर्षी वी.स खांडेकर लिखित ययाति या नाटकात एका विदूषकाची भूमिका निभावली. पण कुटुंबाच्या आग्रहापोटी त्यांनी नोकरी करावीच लागली अशोक सराफ यांनी दहा वर्ष एका बँकेत नोकरी केली. पण तिथे त्यांचं मन काही रमत नव्हते. वेळेचे योग्य नियोजन करून अशोक सराफ यांनी नोकरी सोबत नाटकात छोट्या-मोठ्या भूमिकाही केल्या. त्यासोबत काही संगीतनाटक ह़ी त्यांनी केली. 

Ashok Saraf Wife –

मित्रांनो, आता आपण बघणार आहोत Ashok Saraf Wife च्या बाबतीत तर अशोक सराफ यांच्या पत्नीचे नाव आहे निवेदिता जोशी-सराफ आहे. निवेदिता या पण सिने अभिनेत्री आहेत. या दोघांनी बर्याच चित्रपटात सोबतही काम केले आहे. अशोक सराफ आणि निवेदिता जोशी यांच्या प्रेम कहानी पण फार गमतीशीर आहे. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल निवेदिता जोशी यांचे वडील अशोक सराफ (Ashok Saraf) चे चांगले मित्र होते. 

सुरुवातीला निवेदिता यांनी जेव्हा अशोक सराफ सोबत पहिला चित्रपट केला तर त्या सांगतात दोघेही एकमेकांना एक शब्दही बोलले नाही. 2-3 चित्रपट झाल्यावर ते एकमेकांना बोलू लागले. त्यावेळी सुपरस्टार असणारे अशोक सराफ कड़े निवेदिता जोशी फार प्रभावित झाल्या होत्या.

आणि त्यांनी मनोमन ठरवलं होतं लग्न करायचं तर अशोक सराफ पण सोबतच… नाही तर नाही. आणि एक वेळ तर नंतर त्यांची स्वतःहून अशोक सराफ (Ashok Saraf) यांना लग्नासाठी मागणी घातली. पण चित्रपट सृष्टीतील व्यक्तीशी लग्न करण्यासाठी निवेदिता च्या आई आणि बहिणी चा विरोध होता.

पण काही काळाने हा विरोध मावळला आणि दोघांनीही लग्न केले. आणि आज त्यांना अनिकेत नावाचा एक मुलगा ही आहे. अशोक सराफ यांचा मुलगा म्हणजे अभिनय क्षेत्रात येणार हा सर्वांचा अंदाज पण अनिकेत ने शेफ़ बने पसंत केले. 

Ashok Saraf Career –

मित्रांनो, आपल्या निखळ विनोदाने आणि विनोदाच्या जबरदस्त टाइमिंग चे धनी असलेले अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी आतापर्यंत नाटक, मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, हिंदी मालिका यामध्ये विनोदी भूमिका साकारून आपल्या सर्वांचे मनोरंजन केले. सर्वात प्रथम अशोक सराफ यांनी वि.स खांडेकर लिखित ययाती नाटकात एका विदूषकाची भूमिका साकारली आणि प्रेक्षकांना खळखळून हसवलं.

कालांतराने त्यांच्या अभिनय प्रतिभा ओळखून त्यांना एका छोट्याशा रोल ची ऑफर केली गजानन जागीरदार यांनी. 1971 ला “दोन्ही घरचा पाहुणा” या चित्रपटाने अशोक सराफ यांनी मोठ्या स्क्रीनवर एन्ट्री केली.

पण अशोक सराफ (Ashok Saraf) तीन ते चार वर्षे मोठ्या यशाची वाट पाहावी लागली. पण ती वेळ आली 1975 ला दादा कोंडके चा “पांडू हवालदार” चित्रपटातून त्यानंतर अशोक सराफ आणि मागे वळून बघितले नाही. त्यानंतर अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी मराठी चित्रसृष्टीत धुमाकूळ घालत होती.

अशोक सराफ (Ashok Saraf) यांच्या कारकिर्दीत प्रमुख चित्रपट ठरले ते आयत्या घरात घरोबा, गंमत-जंमत, नवरी मिळे नवऱ्याला, अशी ही बनवाबनवी, भुताचा भाऊ. या चित्रपटांनी अशोक सराफ यांना यशाच्या शिखरावर नेउन ठेवले.

Ashok Saraf Marathi –

मित्रांनो, मराठी चित्रपट सृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारे अशोक मामांनी आपले नशीब हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये ह़ी आजमावले आणि अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी तेथेही यशाला गवसणी घातली. त्यांच्या सुंदर विनोदी अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीतीत आपली वेगळी ओळख निर्माण केली.

व त्यांनी करण अर्जुन, कोयला, बेटी नंबर वन, खूबसूरत, संगदिल सनम, कुछ तुम कहो कुछ हम कहे, तो ऐसी भी क्या जल्दी, प्यार किया तो डरना क्या, जोरू का गुलाम, सिंघम, या काही लोकांना लक्षात राहिल अशा भूमिका निभावल्या. त्याच्या सोबतच त्यांनी हिंदी मलिका मधूनही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. त्यात हम पांच, डोन्ट वरी हो जायेगा, छोटी बडी बाते. या मालिकांमध्ये त्यांनी जबरदस्त विनोदी भूमिका बजावल्या. पण 1995 मध्ये आलेली हम पांच मालिका आजही लोक विसरले नाहीत. 

Ashok Saraf Awards –

मित्रांनो, आता आपण बघणार आहोत अशोक सराफ यांना मिळालेला पुरस्कारांची ची माहिती तसेच अशोक सराफ यांना बरेच लहान-मोठे पुरस्कार मिळाले आहेत पण आज आपण त्यांच्या प्रमुख पुरस्काराबद्दल बघूया.

(1) अशोक सराफ यांना राम राम गंगाराम चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.

(2) पांडू हवलदार चित्रपटासाठी अशोक सराफ यांना महाराष्ट्र सरकार तर्फे गौरव करण्यात ह़ी आला. 

(3) भोजपुरी फिल्म “माईका बिटुआ” तील अभिन्यासाठी अशोक सराफ (Ashok Saraf) यांना पुरस्कारही मिळाला आहे.

(4) Best Comedian in maharashtra favorite kon ?  पुरस्कार ह़ी अशोक सरफानाच मिळाला होता.

मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला जरुर कमेंट बॉक्समध्ये कळवा. काही त्रुटी असतील तर आम्हाला निसंकोच सांगा. आणि या सारखीच नवीन नवीन माहितीसाठी भेट देत राहा BestinMarathi.com ला. आपण आपल्या अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपले मनापासून…धन्यवाद.

 

Leave a Comment