आशिया कप विजेता यादी | Asia Cup Winners List in Marathi.

नमस्कार मित्रांनो, 27 ऑगस्ट 2022 पासून आशिया कप ची सुरुवात झालेली आहे. आशिया खंडातील या सहा टीम्स विजेतेपदासाठी आपसात सात 13 सामने खेळतील आणि आपल्या माहितीसाठी हा एशिया कपचा 15 हंगाम आहे. 1984 ला एशिया कप ची सुरुवात झाली. आतापर्यंत झालेल्या 14 हंगामा एकदिवसीय फॉर्मेट मध्ये खेळवली गेली. पण हा 15 सीजन t20 फॉर्मेट मध्ये खेळला जात आहे. चला तर मग जाणून घेऊया आतापर्यंत कोणकोणत्या संघाने याचे विजेतेपद मिळवले आहे. आशिया कप विजेता यादी | Asia Cup Winners List in Marathi… चला तर मग सुरु करूया.

मित्रांनो दर 2 ते 3 वर्षांनी खेळायला जाणाऱ्या आशिया कप सर्वात जास्त वेळस जिंकणारा संघ भारतीय संघ आहे. भारतीय संघाने तब्बल 7 वेळा आशिया कप आपल्या नावे केलेला आहे. तर दुसऱ्या स्थानी श्रीलंका संघ आहे ज्याने 5 वेळेस विजेतेपद पटकावले आहे.

(1) 1984 (भारत) – श्रीलंका, भारत आणि पाकिस्तान या तीन देशात खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत सुनील गावस्कर यांचे नेतृत्वामध्ये भारतीय संघाने श्रीलंका संघाला 54 रन्स ने मात देत विजेतेपद मिळवले होते.

(2) 1986 (श्रीलंका) – भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका या चार संघात झालेल्या या स्पर्धेत श्रीलंका संघाने दुलीप मेंडिस च्या कॅप्टनशिप मधे फायनल मॅच मध्ये पाकिस्तानला 5 विकेट ने हरवत या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते.

(3) 1988 (भारत) – बांगलादेश मध्ये खेळलेल्या या स्पर्धेत भारतीय संघाने दिलीप वेंगसरकर च्या नेतृत्ववात मध्ये श्रीलंका संघाला फाइनल मध्ये 6 विकेट ने नमवत दुसर्यांदा विजेते पद मिळवले.

(4) 1990-91 (भारत) – भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका या संघामध्ये झालेल्या स्पर्धेत भारतीय संघाने मोहम्मद अजहरुद्दीन च्या नेतृत्ववात श्रीलंका ले 7 विकेट ने नमवून तिसर्यादा या आशिया कप वर आपले नाव कोरले.

(5) 1995 (भारत) –  UAE मध्ये खेळल्या गेलेल्या या आशिया कप मध्ये भारतीय संघाने मोहम्मद अजहरुद्दीन नेतृत्ववात पुन्हा एकदा श्रीलंका संघाला 8 विकेट ने मात देत चौथ्यांदा विजेते पदाचा मान मिळवला.

(6) 1997 (श्रीलंका) – श्रीलंका मध्ये खेळल्या गेलेल्या या ६व्या हंगामात श्रीलंका संघाने अर्जुन रणतुंगा यांच्या नेतृत्ववात भारतीय संघाला फाइनल मध्ये 8 विकेट ने नमवत दुसर्यांदा आशिया कप आपल्या नावे केला.

(7) 2000 (पाकिस्तान) – भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांग्लादेश या 4 देशात खेळल्या गेलेल्या आशिया कप 2000 मध्ये पाकिस्तान ने मोईन खान च्या नेतृत्ववात फाइनल मध्ये श्रीलंका ला 39 रन ने नमवत पहिल्यांदा आशिया कप आपल्या नावे केला.

(8) 2004 (श्रीलंका) – श्रीलंकेत खेळल्या गेलेल्या ८व्या हंगामात श्रीलंका संघाने मर्वन अट्टापट्टू च्या नेतृत्ववात फाइनल मध्ये भारतीय संघाला 25 धावानी नमवत आशिया कप 2004 मध्ये आपले नाव पुन्हा कोरले.

(9) 2008 (श्रीलंका) – पाकिस्तान मधे खेळल्या गेलेल्या आशिया कप च्या 9 व्या हंगामात श्रीलंका संघाने महेला जयवर्धने च्या  नेतृत्ववात पुन्हा एकदा फाइनल मध्ये भारतीय संघाला तब्बल 100 रन नी मात देत आशिया कप आपल्या नावे केला.

(10) 2010 (भारत) – श्रीलंका, भारत, पाकिस्तान, बांग्लादेश या 4 देशात खेळल्या गेलेल्या आशिया कप 2010 मध्ये भारतीय संघाने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्ववात फाइनल मध्ये श्रीलंका संघाला 81 धावांनी मात देत. आशिया कप वर आपले नाव कोरले.

(11) 2012 (पाकिस्तान) – बांग्लादेश मध्ये खेळल्या गेलेल्या आशिया कप मध्ये मिस्बाह उल हक नेतृत्ववात पाकिस्तान संघाने अंतिम सामन्यात बांग्लादेश संघाला 2 धावानी मात देत. आशिया कप आपले नाव कोरले.

(12) 2014 (श्रीलंका) – भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफ़गानिस्तान या 5 देशात खेळल्या गेलेल्या आशिया कप 2014 मध्ये श्रीलंका संघाने एंजेलो मैथ्यूज च्या नेतृत्ववात फाइनल मध्ये पाकिस्तान संघाला 5 विकेट ने मात देत. 5व्या दा आशिया कप वर आपले नाव कोरले.

(13) 2016 (भारत) – UAE, श्रीलंका, पाकिस्तान, बांग्लादेश आणि भारत या 5 देशात खेळल्या गेलेल्या आशिया कप मध्ये भारतीय संघाने महेंद्रसिंह धोनी च्या नेतृत्ववात फाइनल मध्ये बांग्लादेश संघाला 8 विकेट नी मात देत 6व्यंदा आशिया कप आपल्या नावे केला.

(14) 2018 (भारत) – अफ़गानिस्तान, पाकिस्तान, बांग्लादेश, भारत, हांगकांग या 5 देशात खेळल्या गेलेल्या आशिया कप 2018 मध्ये भारतीय संघाने रोहित शर्मा च्या नेतृत्ववात भारतीय संघाने फाइनल मध्ये बांग्लादेश ला 3 विकेट ने मात देत 7 व्यादा आशिया कप वर आपले नाव कोरले.

(15) 2022 (श्रीलंका) – अफ़गानिस्तान, पाकिस्तान, बांग्लादेश, भारत, श्रीलंका या 5 देशात खेळल्या गेलेल्या आशिया कप 2022 मध्ये श्रीलंका संघाने दसून शनाका च्या नेतृत्ववात सर्वाना आश्यर्यचा धक्का देत 15व्या आशिया कप आपल्या नावे केला. इथे झालेल्या अतिम सामन्यात श्रीलंकन संघाने पाकिस्तान संघावर 23 धावाने मात देत.6व्यादा आशिया कप आपल्या नावे केला.

Leave a Comment