नमस्कार मित्रांनो, भारतात क्रिकेटची किती चाहते आहेत हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. येथे क्रिकेटवर आणि क्रिकेट खेळाडूंवर वेड्या सारखे प्रेम केले जाते. चला तर अशाच क्रिकेट वेड्या लोकांसाठी जाणून घेऊया भारतीय क्रिकेटमधली काही रोचक तथ्य भारतीय क्रिकेट मधील रोचक माहिती | indian cricket facts in Marathi ..चला तर मग सुरु करूया.
(1) एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10,000 धावा करण्यात विराट कोहली प्रथम क्रमांकावर आहे.
(2) कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 300 विकेट्स रविचंद्र अश्विन च्या नावे आहे. (54 सामने)
(3) अजित आगरकर ने एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारततियांकडून सर्वात जलद अर्धशतक ठोकले आहे. (21 चेंडू/झिंबाब्वे)
(4) कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 50 विकेट घेणारा जसप्रीत बुमराह भारतीय गोलंदाज आहे.
(5) टी20 क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा सुरेश रैना हा पहिला भारतीय फलंदाज आहे.
(6) एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड़ भारतीयांमध्ये सर्वात मोठी भागीदारी 331 यांच्या नावे आहेत.
(7) कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूंमध्ये सर्वात मोठी भागीदारी (376) लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांच्या नावे आहे.
(8) राहुल द्रविड हा एकमेव भारतीय खेळाडू आहे ज्याने कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या 10 संघांविरुद्ध शतक झळकावली आहे.
(9) टी20 वर्ल्ड कप 2007 मध्ये इंग्लंड विरुद्ध युवराज सिंगने एका षटकात सहा षटकार मारले होते.
(10) 1983 वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाचा कर्णधार कपिल देव होता.
(11) टी20 वर्ल्डकप 2007 जिंकणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा होता.
(12) 2011 वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी होता.
(13) पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार सौरव गांगुली हा होता.
(14) भारताचा सर्वात मोठा कसोटी विजय (एक डाव 262 धावा) अफगाणिस्तान विरुद्ध आहे.
(15) भारताचा सर्वात मोठा वनडे विजय (317 धावा) श्रीलंका विरुद्ध आहे.
(16) भारताचा टी20 क्रिकेटमध्ये सर्वात मोठा विजय (168) हा न्यूझीलंडविरुद्ध आहे.
(17) इंग्लंड विरुद्ध 2016 मध्ये घोषित केलेल्या भारताच्या सर्वोच्च कसोटी धावसंख्या 759/7 विकेट आहे.
(18) महेंद्रसिंग धोनी हा एकमेव भारतीय कर्णधार आहे ज्यांनी आयसीसी च्या तिन्ही मोठ्या ट्रॉफी (वनडे विश्वचषक,चॅम्पियन ट्रॉफी, t20 विश्वचषक) जिंकले आहे.
(19) भारतीय संघाने 2002 आणि 2013 मध्ये अशा दोनदा आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे.
(20) भारतीय संघाने 1983 यांनी 2011 अशा दोनदा वनडे विश्वचषक आपल्या नावे केला आहे.
(21) भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये मध्ये सर्वाधिक 619 बळी घेणारा घ्यायचा विक्रम अनिल कुंबळे च्या नावे आहे.
(22) सचिन तेंडुलकर हा कसोटी क्रिकेटमध्ये 15,921 धावासह सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
(23) कपिल देव हे 400 विकेट घेणारे पहिले भारतीय गोलंदाज आहे.
(24) कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणार सुनील गावस्कर पहिले भारतीय फलंदाज आहे.
(25) भारताचा पहिला परदेशी कसोटी विजय 1967 मध्ये न्युझीलँड विरुद्ध झाला.
(26) भारताचा पहिला कसोटी विजय 1952 मध्ये मद्रास येथे इंग्लंड विरुद्ध झाला.
(27) भारतीय संघाचे पहिले कर्णधार सी के नायडू हे होते.
(28) भारतीय संघाने आपला पहिला कसोटी सामना जून 1932 मध्ये लॉर्ड्स येथे इंग्लंड विरुद्ध खेळला.
(29) ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2017 मध्ये पुजाराने 11 तास 37 मिनिटे फलंदाजी केली ही कसोटी भारतात ची सर्वात मोठी खेळी आहे.
(30) एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10,000 धावा करणारा विराट कोहली पहिला भारतीय खेळाडू आहे.
(31) जवागल श्रीनाथ च्या नावे 44 विकेट्स एक भारतीयाकडून वर्ल्डकप मध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम आहे.
(32) दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकणारा भारत हा पहिला आशियाई संघ आहे.
(33) मिताली राज महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे ज्यांनी वनडे मध्ये 7000 हून अधिक धावा केले आहेत.
(34) एका कसोटी सामन्यात प्रत्येक डावात तीन वेळा शतक लगावणार सुनील गावस्कर हा एकमेव भारतीय खेळाडू आहे.
(35) 2014 मध्ये रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध 264 धावा करत वनडे मध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम केला होता.
(36) विनू मंकड हा एकमेव भारतीय खेळाडू आहे ज्याने कसोटी सामन्यात पाच दिवस फलंदाजी केली आहे.
(37) प्रथम क्षणी सामन्यात एका षटकात सहा षटकार मारण्याचा विक्रम रवी शास्त्री यांच्या नावावर आहे.
(38) हरभजन सिंग कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा पहिला भारतीय गोलंदाज आहे.
(39) वनडे क्रिकेटमध्ये सलग चार वेळेस सामनावीर पुरस्कार जिंकण्याचा विक्रम सौरव गांगुली च्या नावे आहे.
(40) भारतीय क्रिकेट संघाने 2013 ते 2017 दरम्यान सलग तेरा कसोटी मालिका जिंकून मायदेशात सर्वाधिक सलग कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे.
(41) एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका सामन्यात शतक आणि पाच विकेट घेण्याचा विक्रम कपिल देव यांच्या नावावर आहे.
(42) अनिल कुंबळेच्या नावावर 1999 मध्ये पाकिस्तान विरुद्ध सर्व 10 विकेट्स घेऊन एका भारतीयांकडून कसोटीच्या एका डावात सर्वोत्तम गोलंदाजी करण्याचा विक्रम आहे.
(43) 2023 पर्यंत सचिन तेंडुलकर हा कसोटी आणि एक दिवशी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.
(44) कसोटी क्रिकेटमध्ये कसोटीच्या पहिल्याच ओव्हर मध्ये हॅट्रिक घेणारा इरफान पठाण हा एकमेव गोलंदाज आहे. ज्याने 2006 कराची कसोटीत पाकिस्तान विरुद्ध आपल्या पहिल्या षटकाच्या चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर विकेट्स घेतल्या होत्या. (सलमान भट, युनूस खान, मोहम्मद युसुफ)
(45) एक दिवशी क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक लावणारा विक्रम सचिन तेंडुलकर यांच्या नावे आहे.
(46) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त चौकार पंधरा हजार तीनशे दहा सचिन तेंडुलकरच्या नावे आहे.
(47) विश्वचषकात हॅट्रिक घेणारा चेतन शर्मा हा पहिला भारतीय गोलंदाज आहे.
(48) भारताने आपला पहिला डे-नाईट कसोटी सामना 2019 मध्ये बांगलादेश विरुद्ध खेळायला.
(49) टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक (12 चेंडू) युवराज सिंग यांच्या नावे आहे.
(50) टी20 क्रिकेटमध्ये 5 विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज युवराज सिंह आहे.