नमस्कार मित्रांनो, आयपीएलचा 16वा हंगाम सध्या सुरू आहे. आपल्या सगळ्या भारतीयांच्या नजरा या इकडे लागलेले आहेत आणि सर्वांना उत्सुकता आहे की ह्या वेळेस आयपीएलचा विजेता कोण होईल. त्याकरता चला जाणून घेऊया आयपीएल इतिहासात कोणकोणत्या संघाने आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहेत. आयपीएल विजेता संघांची यादी | IPL Winners List in Marathi… चला तर मग सुरु करूया.
मित्रांनो आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स ज्याने पाच वेळेस आयपीएल विजेतेपद पटकावले आहे. त्यानंतर नंबर येतो चेन्नई सुपर किंग्स यांनी चार वेळेस विजेतेपद आपल्या नावे केले आहे.
वर्ष | विजेता |
2008 | राजस्थान रॉयल्स |
2009 | डेक्कन चार्जर्स |
2010 | चेन्नई सुपर किंग्स |
2011 | चेन्नई सुपर किंग्स |
2012 | कोलकत्ता नाईट रायडर्स |
2013 | मुंबई इंडियन्स |
2014 | कोलकत्ता नाईट रायडर्स |
2015 | मुंबई इंडियन्स |
2016 | सनरायझर्स हैदराबाद |
2017 | मुंबई इंडियन्स |
2018 | चेन्नई सुपर किंग्स |
2019 | मुंबई इंडियन्स |
2020 | मुंबई इंडियन्स |
2021 | चेन्नई सुपर किंग्स |
2022 | गुजरात टायटन्स |
2023 | चेन्नई सुपर किंग्स |
(1) आयपीएल 2008 – राजस्थान रॉयल्स – आयपीएलचा पहिला हंगाम आपल्या नावे केला होता शेन वॉर्न नेतृत्वात खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सने. आयपीएल 2008 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्स चा 03 विकेटने पराभव करत राजस्थान रॉयल्सने इतिहास रचला होता.
(2) आयपीएल 2009 – डेक्कन चार्जर्स – आयपीएलचा दुसरा हंगामा आपल्या नावे केला होता डेक्कन चार्जर्स ने ॲडम गिलख्रिस्ट च्या नेतृत्वात अप्रतिम कामगिरी करत डेक्कन चार्जेर्सने आयपीएल 2009 चा अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर बेंगलोर चा 6 धावांनी पराभव करत आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते.
(3) आयपीएल 2010 – चेन्नई सुपर किंग्स – आयपीएल 2010 चे विजेतेपद पटकावले महेंद्रसिंग धोनींच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स ने. आयपीएल 2010 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्स ने मुंबई इंडियन्स ला 22 धावांनी नमवत पहिल्यांदा विजेतेपद आपले नावे केले.
(4) आयपीएल 2011 – चेन्नई सुपर किंग्स – मित्रांनो आयपीएल 2011 ची विजेतेपद सलग दुसऱ्यांदा आपल्या नावे केली चेन्नई सुपर किंग्स ने धोनीच्या नेतृत्वात जबरदस्त खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स ने अंतिम सामन्यात आर.सी.बी (RCB) ला तब्बल 58 धावांनी मान देत सलग दुसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले.
(5) आयपीएल 2012 – कोलकत्ता नाईट रायडर्स – मित्रांनो आयपीएल 2012 चे विजेते पद आपले नावे केले गौतम गंभीर नेतृत्वात खेळणाऱ्या कोलकत्ता नाईट रायडर्स ने आयपीएल 2012 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला 5 विकेटने मात देत कोलकत्ता नाईट रायडर्स ने पहिल्यांदा आयपीएल चे विजेतेपद आपल्या नावे केले.
(6) आयपीएल 2013 – मुंबई इंडियन्स – आयपीएल 2013 चा किताब आपल्या नावे केला रोहित शर्माचे नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने. आयपीएल 2013 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्स वर 23 धावांनी मात करत पहिल्यांदा आईपीएल किताब मुंबई इंडियन्स ने आपल्या नावे केला.
(7) आयपीएल 2014 – कोलकत्ता नाईट रायडर्स – मित्रांनो आयपीएल 2014 मध्ये गौतम गंभीरच्या नेतृत्वात कोलकत्ता नाईट रायडर्स ने दुसऱ्यांदा IPL चषक आपल्या नावे केला. आईपीएल 2014 च्या अंतिम सामन्यात कोलकत्ता नाईट रायडर्सनी किंग्स इलेव्हन पंजाब वर 3 विकेटने रोमहर्षक विजय मिळवला आणि दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी आपल्या नवी केली.
(8) आयपीएल 2015 – मुंबई इंडियन्स – आयपीएल 2015 च्या IPL विजेता पदाचा मान मिळवला रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला. संपूर्ण हंगामात जबरदस्त खेळ दाखवत मुंबई इंडियन्स अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्स 41 धावांनी मात करत दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी आपले नाव कोरले.
(9) आयपीएल 2016 – सनरायझर्स हैदराबाद – मित्रांनो आयपीएल 2016 चे विजेते पद पटकावत सर्वाना अश्चय्चाकित करत सनरायझर्स हैदराबादने. डेव्हिड वॉर्नरचे नेतृत्वात हैदराबादने आयपीएल 2016 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर बेंगलोरला 8 धावांनी मात देत पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी आपल्या नावे केली.
(10) आयपीएल 2017 – मुंबई इंडियन्स – मित्रांनो आयपीएल 2017 चे विजेतेपद तिसऱ्यांदा आपल्या नावे केले मुंबई इंडियन्स ने. रोहित शर्माचे नेतृत्वात मुंबईने आयपीएल 2017 च्या अंतिम सामन्यात नवीनच असलेल्या रायझिंग पुणे जेंट्स चा केवळ 1 धावांनी पराभव करत आयपीएल ट्रॉफी आपल्या नावे केली.
(11) आयपीएल 2018 – चेन्नई सुपर किंग्स – आयपीएल 2018 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात सी एस के ने जबरदस्त खेळ करत तिसऱ्यांदा आयपीएल विजेतेपद मिळवले. आयपीएल 2018 च्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादला एकतर्फी 8 विकेटने मत देत आयपीएल विजेतेपद आपले नावे केले.
(12) आईपीएल 2019 – मुंबई इंडियन्स – आयपीएल 2019 मध्ये मुंबई इंडियन्स ने पुन्हा एकदा म्हणजे चौथाद्या आयपीएल आपले नाव कोरले. आयपीएल 2019 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स ने अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्स वर केवळ 1 धावांनी मात करत चौथ्यांदा आयपीएल विजेतेपद मिळवले.
(13) आयपीएल 2020 – मुंबई इंडियन्स – मित्रांनो आयपीएल 2020 मध्ये मुंबई इंडियन्स ने इतिहास रचत आयपीएल किताबावर पाचव्यांदा आपले नाव कोरले. आयपीएल 2020 च्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर 5 विकेट्स ने मात करत पाचव्यांदा आयपीएल विजेतेपद आपल्या नावे केले.
(14) आयपीएल 2021 – चेन्नई सुपर किंग्स – मित्रांनो आयपीएल 2021 मध्ये चेन्नई ने ही इतिहास रचत आयपीएल किताबावर चौथ्यांदा आपले नाव कोरले. धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्स ने आयपीएल 2020 च्या अंतिम सामन्यात के.के.आर वर 27 धावांनी मात करत चौथ्यांदा आयपीएल विजेते पद पटकावले.
(15) आयपीएल 2022 – गुजरात टायटन्स – मित्रांनो आयपीएल 2022 च्या विजेतेपदाचा मान मिळवला तो पहिल्याच वर्षी आयपीएल खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने. हार्दिक पांड्याचे नेतृत्वात अफलातून कामगिरी करणाऱ्या गुजरातने आयपीएल 2022 च्या अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सला सात विकेट नी मात देत पहिल्यांदा आईपीएल वर आपले नाव कोरले.
(16) आयपीएल 2023 – चेन्नई सुपर किंग्स – आयपीएलचा १६वा हंगामा आपल्या नावे केला चेन्नई सुपर किंग्स ने महेंद्रसिंह धोनी च्या नेतृत्वात अप्रतिम कामगिरी करत चेन्नई सुपर किंग्स ने आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स चा 5 विकेट ने पराभव करत पाचव्या दा आयपीएलचे विजेतेपद पटकावले.