नमस्कार मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहोत नागपंचमी या श्रावन महिन्यात येणारे सणाबद्दल नागपंचमी श्रावन महिन्यात शुल्क पंचा लक्ष्मीला पंचमीला साजरी केली जाते. सनातन हिंदु धर्मात नागला एक महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. एक प्रकारे नागांना देवाचा दर्जा देऊन त्यांची पूजा केली जाते. चला तर मग जानुन घेउया. नागपंचमी सना बद्दल माहिती | Nag Panchmi Information in Marathi.चला तर मग शुरू करुया.
कारण देवाचे देव महादेव ही वासूच्या नागाला आपल्या गळ्यात विराजमान करतात. आणि भगवान विष्णू ही शेषनागावर विराजमान आहेत. त्याचप्रमाणे नागदेवते मुळे समुद्रमंथन घडून शकले.
यासारख्या असंख्य कारणांसाठी नागांना हिंदू धर्मात नागाला श्रेष्ठ मानून त्यांची पूजा केली जाते. त्यांना दूध आणि प्रसाद चढवला जातो. नागांचे देवता महादेवाला मानले जाते त्यामुळे महादेवा सोबतच नागाचा ही अभिषेक केला जातो व हार फुले चढवली जातात. आणि त्यामुळे सर्पदोषातून मुक्ती मिळते अशी ह़ी धारणा आहे.
नागपंचमी कथा | Nag Panchami Story in Marathi
चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया नागपंचमीची नेमकी कथा काय आहे. एका नगरात एक गृहस्थ राहत होते त्यांना सात मुले होती. त्यांच्या सात ही मुलांची लग्न झालेली होती. सगळ्या सूनामध्ये त्यांची सर्वात लहान असून फारच संस्कारी विनम्र होती. पण तिच्या माहेरी अशी परिस्थिती फारच हलाखीची होती. आणि नंतर तिच्या माहेरी कोणी उरले नव्हते.
एका वर्षी घर सारवण्यासाठी (लेपन्या) सर्व सुना माती आणण्यासाठी जातात. तेथे मोठ्या सुनबाई ला माती गोळा करता करता नाग दिसतो. तेव्हा मोठी सुनबाई खुरप्याने त्या नागाला मारण्याचा प्रयत्न करते. पण तेव्हा लहान सून त्यांना मारण्यापासून थांबवतात. आणि म्हणतात “तो आपल्याला काही करणार नाही त्याला शांततेने जाऊ द्या”.
सुनबाई म्हणल्याप्रमाणे नाग शांततेने तिथून निघून जातो. आणि काही अंतरावर जाऊन थांबतो. सर्व कामे आटोपल्यावर लहान सुनबाई नागा जवळ जाऊन म्हणतात. “आपण येथून कुठेही जाऊ नका मी तुम्हाला पिण्यासाठी दूध आणते” असे बोलून सूनबाई घरी जाते आणि घरच्या कामात व्यस्त होते.
आणि तिला दुसऱ्या दिवशी लक्षात येते आपण नागाला दूध देण्याचे विसरलो. मग ती लगेच तिथे दूध घेऊन जाते. तर नागदेवता तिथेच बसलेला असतो. सुनबाई त्याच्याजवळ जाते आणि म्हणते “भाऊ मला माफ कर मी तुला दिलेले वचन पाळऊ नाही शकले” त्यावर नाग म्हणतो “तू मला खोटं बोललीस म्हणून मी तुला जाऊ शकतो. पण मी तसं करणार नाही कारण तू मला भाऊ म्हणालीस म्हणून आज पासून तू माझी बहीण झालीस सांग तुला काय हवय
सुनबाई म्हणते “माझ्या माहेरी माझं कोणी नव्हतं पण आज मला माझा भाऊ भेटला आता मला काहीही नको. फक्त जेव्हा मी तुला बोलवेल. तेव्हा तू माझा भाऊ बनून ये” नंतर काही दिवसांनी श्रावण महिना चालू झाल्यावर प्रत्येक सुन आपआपल्या माहेरी जाण्याच्या तयारीत असते.
तेव्हा मोठी सून खोचक पने लहान सुनेला विचारते. “आम्ही तर चाललो आहोत माहेरी तू कुठे जाणार. तुझ्या तर माहेरी कोणीच नाही” तेव्हा लहान सुनेला फार वाईट वाटते आणि ती खूप रडते. तेव्हा नागदेवता मनुष्यरूप धारण करून लहान सुनेच्या सासर घरी जातात.
तिच्या सासर्याला म्हणतात “मी माझ्या बहिणीला घ्यायला आलो आहे’ तेव्हा सासरे म्हणाले तिच्या माहेरी तर कोणीच नाही मग तु हीचा भाऊ कसा. नागदेवता म्हणतात मी तिचा दुरचा भाऊ आहे. पूर्ण खात्तर जमा झाल्यावर सुनबाई नागदेवता सोबत माहेर निघतात.
नागदेव सूनबाईला म्हणाले काही दिवसात दिवस तू माझ्याकडेच नागलोक मध्ये रहा. तुला दुःखी होण्याचे काही कारण नाही. नागलोक मध्ये गेल्यावर नाग़देवाने सुनबाईला नागमाते जवळ नेले. आणि नागमातेला सांगितली ही माझी बहीण आहे आणि एकदा हिने माझे प्राण ह़ी वाचवले होते. आताही काही दिवस आपल्या इथेच राहील नाग मातेने सूनबाईचे आनंदाने स्वागत केले.
तिथेच नाग लोकात शेष नागाचे लहान लहान नाग ह़ी राहायचे. नाग माता रोज दूध थंड करून घंटी वाजवून लहान नागांना बोलून घ्यायची आणि घंटी वाजल्यावर लहान नाग तेथे दूध पिण्यासाठी येत. एक दिवस सूनबाई नाग पिल्लांना दूध देण्यासाठी जाते चांगल्या प्रकारे दूध थंड ह़ी झालेले नसते आणि घाईघाईत सुनबाई घंटी वाजवते. नागाचे पिल्लू घंटी वाजल्या बरोबर दूध पिण्यासाठी तिथे जातात आणि दूध प्यायला लागतात.
पण दुध गरम असल्याकारणाने लहान नागांचे तोंड जळते लहान नागांना सुनबाईचा फार राग येतो आणि ते सुनबाई ला चावायला धावतात. तेव्हा नागमाता लहान नागांना समजुन सांगतात.आणि म्हणतात तिच्याकडून चुकीने झाली तिला माफ करा. मग कुठे लहान नाग शांत होतात.
काही दिवसांनी नागदेव सुनबाईला सासरी सोडण्यासाठी निघतात. तेव्हा नागमाता सुनबाईला भरपूर सोने-नाणे देतात. बरोबर एक अमूल्य असा मोत्याचा हार पण देतात. सासरी आल्यावर सगळे जण आश्चर्यचकित होतात. आणि त्या मोत्यांच्या हाराची चर्चा तर पूर्ण गावभर होते. ही चर्चा नगराच्या राजाच्या कानी येते. आणि राणीला ही त्या हाराचे आकर्षण वाटू लागते. आणि तो हार मला हवा असा राजाजवळ हट्ट धरते.
त्यावेळेस राजा सैनिकांना आदेश देतात की लगेच तो हार आमच्याकडे आणावा. सासरे राज्याच्या आदेशाला घाबरून सुनबाई च्या मनाविरुद्ध तो हार सैनिकांना देऊन टाकतात.राजमहालात आल्यावर राजाला तो हार दिला जातो. मग रानी जेव्हा त्या हाराला घालतात. तेव्हा तो हार…मोत्याचा ह़ार रन राहता नागांमध्ये बदलून जातो.
तेव्हा राजा तातडीने सुनबाई बोलून घेतो आणि हा काय प्रकार आहे विचारतो. तेव्हा सुनबाई राजाला पूर्ण प्रकार सांगते. तेव्हा नागदेवता तिथे उपस्थित होतात. आणि राजाला सांगतात ही माझी बहीण आहे आणि तो हार मी तिला दिला आहे. हे सर्व ऐकून राजा आणि सर्वजण नागदेव त्याला नमस्कार करतात. आणि त्यादिवशी पंचमी असल्याकारणाने त्या दिवशी पासून नागपंचमी सुरू झाली. आणि नागपंचमीला सर्व महिला नागाला आपला भाऊ मानून नागदेवताची पूजा करतात आणि त्यांना प्रसाद घालतात.