नेहा पेंडसे जीवन कथा | Neha Pendse Biography in Marathi

 नमस्कार मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहोत मराठी चित्रपट सृष्टीतील एक सुंदर अभिनेत्री जी ने आपल्या सुंदरतेने आणि अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्र भर का्य देशभर आपले असंख्य चाहते निर्माण केले आहे. तुम्हाला कल्पना असेलच आपण बोलत आहोत मराठी चित्रपटसृष्टीतील आणि हिंदी मराठी मालिकांमधून घराघरात पोचलेली अभिनेत्री नेहा पेंडसे (Neha Pendse) बद्दल. चला तर मग जाणून घेऊया. Neha Pendse Biography in Marathi त्यांचे बालपण कुटुंब करियर आणि त्यांच्या आयुष्याबद्दल काही महत्वाच्या गोष्टींबद्दल…चला तर मग सुरु करूया.

Neha Pendse Family – नेहा पेंडसे कुटुंब बालपन.

मित्रांनो बोलायचं बोलायचं झालं नेहा पेंडसे च्या बालपणी आणि कुटुंबाचे बाबतीत तर… नेहा पेंडसे यांचा जन्म 29 नोव्हेंबर 1984 ला मुंबई, महाराष्ट्र मध्ये झाला. नेहाच्या घरी त्यांचे वडील विजय पेंडसे, आई शुभांगी पेंडसे आणि बहीण मिलन पेंडसे असतात. नेहा पेंडसे Neha Pendse संपूर्ण शिक्षण मुंबईमध्ये झालं.

नेहाला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. आणि तिचे अभिनयाचे करिअरही बालपणी सुरू सुरू झाले. नेहाने बालकलाकार म्हणून एकता कपूरच्या बालाजी टेलीफिल्म्स प्रस्तुत कॅप्टन हाऊस या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तसेच लहानपणापासूनच नेहाला नृत्याची आवड होती. आणि नेहा आता एक प्रशिक्षित क्लासिकल डान्सर आहे.

Neha Pendse Career – नेहा पेंडसे करियर 

मित्रांनो बालकलाकार म्हणून आपल्या अभिनयाची सुरुवात करणारी सुंदर अभिनेत्री नेहा पेंडसे नी  हिंदी चित्रपटसृष्टीत आपले पदार्पण केले 1999 मध्ये निर्देशक सुभाष सहगल यांच्या प्यार कोई खेल नही या चित्रपटातून. यामध्ये नेहा चे सहकलाकार होते सनी देओल महिमा चौधरी आणि अपूर्व अग्निहोत्री या चित्रपटात नेहाने अभिनेता सनी देओल च्या बहिणीची भूमिका बजावली.

नंतर नेहाने दाग द फायर, दिवाने, छुपा रुस्तम, देवदास, असे अनेक चित्रपटात छोट्या-मोठ्या भूमिका निभावल्या. आणि तिच्या अभिनयाचे कौतुक ही फार झाल. त्यानंतर नेहा पेंडसे Neha Pendse यांना मराठी सोबतच तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, चित्रपटाची ऑफर येऊ लागल्या.

2002 मध्ये सोंथम (Sontham) नावाचा पहिला तेलगू चित्रपट केला. त्याच वर्षी नेहाने mounam pesiyadhe नावाचा तमिळ चित्रपटही केला. 2005 मध्ये नेहाने Made in USA नामक मल्याळम चित्रपटातील ही भूमिका निभावली. आणि याच वर्षी कन्नड भाषे मध्ये Inspetor Jhansi नावाचा चित्रपटही केला. आणि ह्या भाषांमध्ये त्यांनी अनेक चित्रपट केले.

आणि 2009 मध्ये नेहा पेंडसे नी मराठी चित्रपट पदार्पण केले. त्यांनी पहिली भूमिका निभावली अग्निदिव्य या चित्रपटात या सोबत त्यांचे सहकलाकार होती सुबोध भावे, मोहन जोशी, मोहन आगाशे. 

यासोबतच नेहा पेंडसे ने शर्यत, कुरुक्षेत्र यामध्ये ॲटम नंबर ही केले. त्यांतर नेहा पेंडसे ने 2016 मधील सुपर हिट मराठी चितपट नटसम्राट मधे ह़ी भूमिका केली. 

Neha Pendse Television – नेहा पेंडसे च्या मालिका. 

मित्रांनो अशा अनेक चित्रपटात आपल्या अभिनयाची चुणूक दाखवनार्या Neha Pendse नेहा पेंडसे ने टेलीविजन शोमध्येही भरभरून यश मिळवलं. 1995 मध्ये बालकलाकार म्हणून कॅप्टन हाऊस मालिकेतून सुरुवात करणारा नेहा पेंडसे नंतरच्या काळात पड़ोसन, मिठी मिठी बाते, पिंपळपान, हसरते अशा अनेक हिंदी मराठी मालिकांमध्ये अभिनय केला.

पण 2016 मध्ये Life OK वरील हिंदी मालिका May I Come Madam मे आय कम इन मॅडम ने नेहा पेंडसे ना प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवले. यात संजना हितेशी नामक भूमिका लोकांना फार आवडली. त्यानंतर नेहाला मोठमोठ्या प्रोडक्शन हाऊस कडून ऑफर येऊ लागल्या.

त्यानंतर त्यांनी 2017 मध्ये कॉमेडी दंगल मध्ये सहभाग घेतला. 2018 नेहा पेंडसे Neha pendse साठी खास वर्षे राहिली. यात त्यांनी प्रसिद्ध टीव्ही शो फॅमिली विथ कपिल शर्मा यामध्ये कपिल शर्मा सोबत शो होस्ट केला. त्यानंतर एंटरटेनमेंट की रात या प्रसिद्ध शोमध्ये त्यांनी सभा सहभाग नोंदविला.

नंतरच्या काळात बिग बॉस 12 या प्रसिद्ध रियलिटी शो मध्ये नेहा पेंडसे यांनी सहभाग घेतला. आणि तिथून त्यांच्या प्रसिद्धी चा आलेख वाढतच गेला. आणि आता सध्या स्थितीत नेहा पेंडसे Neha pendse प्रसिद्ध टीव्ही शो भाभी जी घर पर है मध्ये भूमिका  निभावत आहे.

या सोबत नेहा पेंडसे मराठी मालिकांमध्ये ह़ी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 2011 मध्ये नेहानी भाग्यलक्ष्मी मालिकेत भूमिका निभावली . आणि 2011 मध्ये झी मराठी Zee Marathi वरील चर्चित रियालिटी शो एका पेक्षा एक अप्सरा आली यामध्ये सहभाग नोंदवला होता. 

अशोक सराफ जीवन चरित्र –

Neha Pendse Hobbies – नेहा पेंडसेची आवड. 

* आवडता अभिनेता – शाहरुख खान, अक्षय खन्ना.

* आवडती अभिनेत्री – काजल, श्रीदेवी. 

* आवडता रंग – गुलाबी. 

* आवडते संगीत दिग्दर्शक – जतिन ललित. 

* आवडता चित्रपट –

* आवडती जागा –

Neha Pendse Boyfriend Husband.

मित्रानो आता आपण बघुया नेहा पेंडसेच्या बॉयफ्रेंड आणि पति बद्दल तर नेहा पेंडसेच्या पति चे नाव शार्दुल सिंह ब्यास. नेहा पेंडसे आणि शार्दुल सिंह ब्यास ची पहिली भेट ऐका मित्राच्या पार्टीत झाली. आणि पहिल्याच भेटीत दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. 2 ते 3 वर्ष एकमेकाना डेट केल्यावर दोघानी 5 जानेवारी 2020 ला महाराष्ट्रीयन पद्धति ने विवाह केला.

आणि आणखी ऐक गोष्ट शार्दुल सिंह ब्यास यांचे या पूर्वी 2 लग्न झालेले आहेत. नेहा सोबत त्यांचा तीसरा विवाह आहे…असो नेहा पेंडसे आणि शार्दुल सिंह ब्यास याना Best in Marathi तर्फे सुखी संसाराच्या हार्दिक शुभेच्छा.

Neha Pendse Movies – नेहा पेंडसे चित्रपट.

वर्ष 

चित्रपट

भाषा 

1999

प्यार कोई खेल नहीं. 

हिंदी 

1999

दाग़- द फ़ायर. 

हिंदी 

2000 

दीवाने.

हिंदी 

2002 

तुम से अच्छा कोण है. 

हिंदी 

2002

देवदास 

हिंदी 

2002

सोंथाम

तेलुगू

2002

मौनम पेसियाधे

तामिल

2003 

इनिधु इनिधु कधल इनिधु:

तामिल

2005

मेड इन यु.एस.ए 

मलयालम

2005

इंस्पेक्टर झांसी

कन्नड़

2006

अब्राहम लिंकन

मलयालम

2007

स्वामी

हिंदी

2007

पैरोडी

कन्नड़

2008

वीधी राउडी

तेलुगू

2009

असीमा

हिंदी 

2009

अग्निदिव्या

मराठी

2010

ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार

मलयालम

2011

स्नेक एंड लैडर 

मलयालम

2011

शर्यत 

मराठी

2011 

दिल तो बच्चा है जी 

हिंदी 

2012

Mr Bhatti On Chutti

हिंदी 

2012

कुरुक्षेत्र

मराठी

2013

टूरिंग टॉकीज

मराठी

2014

दूसरी गोष्ट

मराठी

2014

बोल बेबी बोल

मराठी

2014

प्रेमासाठी coming soon

मराठी

2015

बाळकडू 

मराठी

2015

गौर हरि दास्तान

हिंदी

2016

नटसम्राट 

मराठी

2016

35% काठावर पास 

मराठी

2017

नगरसेवक

मराठी

2020

सूरज पे मंगल भारी

हिंदी

2020

june 

मराठी

 

Neha Pendse Television –

वर्ष 

टी.वी शो  

भाषा 

1995 

कॅप्टन हाऊस

हिंदी

1995

पडोसन

हिंदी 

1996

हसरते 

हिंदी 

1998

मीठी मीठी बाते 

हिंदी

1998

पिंपळ पान

मराठी 

2000

दुश्मन

हिंदी

2002

शुशूऊऊउ… कोई है

हिंदी

2010

भाग्यलक्ष्मी

मराठी

2012

मधुबाला – एक इश्क एक जुनून

हिंदी

2016

May I Come In Madam?

हिंदी

2017

कॉमेडी दंगल

हिंदी

2018

Partners Trouble Ho Gayi Double

हिंदी

2018

फॅमिली टाईम विथ कपिल  शर्मा 

हिंदी

2018

Entertainment Ki   Raat

हिंदी

2018

बिग़ बॉस 12

हिंदी

2019

ख़तरा ख़तरा ख़तरा 

हिंदी

2019

किचन चॅम्पियन 5

हिंदी

2019

बॉक्स क्रिकेट लीग 4

हिंदी

2021-

भाभीजी घर पर है.

हिंदी

 

धन्यवाद…तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल…आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला ज़रूर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. काही चुकी आणि काही कल्पना असतील तरी सांगा. आम्हाला आंनद होइल.आपले मनापासून आभार…धन्यवाद.

Leave a Comment