नमस्कार मित्रांनो, श्रावण महिना चालू होतो तसाच आपल्याला ओढ लागते सर्वांचा आवडता सन रक्षाबंधनाची… हिंदू धर्मात रक्षाबंधनाला असाधारण महत्त्व आहे. भाऊ बहिणीचे च्या या अनोख्या सणात बहीण भावाला राखी बांधते. आणि त्याच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करते. तर भाऊ आपल्या बहिणीला कोणत्याही परिस्थितीत रक्षण करण्याचे वचन बहिणीला देतो. चला तर मग जाणून घेऊया रक्षाबंधना बद्दल माहिती | Raksha Bandhan Essay in Marathi. रक्षाबंधना विषयी माहिती व महत्त्व आणि बरेच काही…चला तर मग सुरु करूया.
रक्षाबंधनाची कथा –
बहिण भावाच्या या सुंदर नात्याच्या खास सनाची सुरुवात आपल्याला महाभारता झालेली दिसते. कथा अशी आहे की… श्रीकृष्णाच्या एका काकुला एक मुलगा होतो त्याचे नाव असते शिशुपाल. शिशुपाल लहानपणी फारच विचित्र आणि विद्रूप होता तेव्हा एकदा आकाशवाणी होते आणि त्याच्या मातेला सांगण्यात येते की शिशुपालला ज्याचा स्पर्श होईल त्याने शिशुपाल चे सर्व विकार दूर होतील पण त्याच्या हातातून शिशूपालाचा वध होईल.
त्यानंतर काही दिवसांनी श्रीकृष्ण आपल्या काकूकडे जातात तेव्हा श्रीकृष्णाच्या स्पर्शाने शिशुपाल चे सर्व विकार दूर होतात. तेव्हा त्याची आई फार आनंदित होते पण तिला दुसरीकडे चिंताही होती. म्हणून शिशुपाल ची आई कृष्णाकडे वचन मागते की तुम्ही शिशुपालच्या सर्व चुका माफ करसाल.
तेव्हा श्रीकृष्ण वचन देतात कि मी शिशुपालच्या शंभर चुका माफ करेल पण नंतर मी त्याला त्या सर्व चुकांची शिक्षा देईल. पुढे चालून शिशुपाल शेदी नावाच्या राज्याचा राजा होतो. पण तो फारच क्रूर राजा असतो. तो जनतेला खूप त्रास द्यायचा आणि श्रीकृष्णाला आव्हाने देत राहायचा.
आणि एकदा शिशुपाल ने चालू राज्यसभेत भगवान श्रीकृष्णाचा अपमान केला. आणि ती चूक शिशुपाल ची 101 वी चूक होती. अनेकदा समजून सांगितल्यावर ही शिशुपाल बिलकुल बदलला नाही. तेव्हा श्रीकृष्णाने आपल्या सुदर्शन चक्राने शिशुपाल चे शिर धडापासून वेगळे केले. आणि त्याला त्याच्या चुकांची शिक्षा दिली.
पण सुदर्शन सोडताना श्रीकृष्णाच्या बोटाला दुखापत झाली. हे पाहून सगळे लोक धावपळ करू लागली. पण तिथेच उभी असलेली द्रोपदी ने क्षणाचाही विचार न करता आपल्या साडीचा कोपरा फाडून श्रीकृष्णाच्या बोटाला बांधला.
तेव्हा श्रीकृष्णाने द्रौपदी चे आभार मानले आणि तुझ्या ही संकटात मी तुझी मदत करेन असे वचन दिले. आणि तेव्हाच रक्षाबंधनाची सुरुवात झाली. आणि दिलेले वचन श्रीकृष्णाने पाळले ही जेव्हा कौरवांनी पूर्ण राज्यसभेत द्रौपदीचे चीरहरण करत होते. त्यावेळेस द्रौपदीने सर्वांकडे मदत मागितली पण कोणीच पुढे आले नाही. त्यावेळेस श्रीकृष्ण द्रौपदीच्या मदतीला आले. ह़ी कथा आपल्या माहिती असेलच.
त्याचबरोबर अशा बऱ्याच कथा आहेत ज्या आपल्याला आपल्या वेदा मध्ये सांगितलेल्या दिसतात. जसे देवांच्या आणि राक्षसांच्या युद्धाच्या वेळस हिम्मत हरलेल्या इंद्रदेवाच्या हातात इंद्रायणी ने राखी बांधली होती. तसेच कुंती ने अभिमन्यूच्या सुरक्षेसाठी त्याच्या हातावर राखी बांधली होती.
मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो कि आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. आवडली असेल तर नक्की शेअर करा.