नमस्कार मित्रांनो, क्रिकेट वेड्या देशात आपल्या अभुतपूर्वक खेळाने भारतच नवे संपूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे वेधनार्या भारताची दिग्गज बॅडमिंटनपटू सायना नेहवाल च्या सुरुवातीपासून तर जागतिक आयकॉन बनण्याच्या प्रवासाचा आज आपण मागोवा घेणार आहोत. सायना नेहवाल संपूर्ण माहिती मराठी : saina nehwal information in marathi. चला तर मग सुरु करूया.
सायना नेहवाल परिचय –
तर मित्रांनो सायना नेहवाल चा जन्म 17 मार्च 1990 ला हरियाणा राज्यातील हिसार येथे झाला. सायना नेहवाल च्या वडिलांचे नाव हरविर सिंह आणि आईचे उषारानी नेहवाल असे आहे.
केवळ वयाच्या 18 व्या वर्षी सायना चा बॅडमिंटनशिप परिचय आला. आणि या खेळाबद्दल सायना चे प्रेम आणि उत्साह अभूतपूर्व असा होता. ह्याच खेळाबद्दल ची आवड सायनाचा पालकांनी हेरली आणि तिला हैदराबादच्या लालबहादूर शास्त्री प्रशिक्षण केंद्र येथे प्रशिक्षना साठी दाखल केले.
येथे तिचे पहिले प्रशिक्षक राहिले नाणीप्रसाद येथे सायना ने प्रचंड मेहनत घेत आपल्या कौशल्य,चपळता आणि फिटनेस मध्ये बरीच सुधारणा केली.
तेथूनच तिने आपला मोर्चा जुनियर बॅडमिंटन स्पर्धेकडे वळवला. आणि येथेही तिने आपल्या खेळाची सर्वांवर छाप टाकली. 2003 मध्ये केवळ वयाच्या तेराव्या वर्षी ज्युनियर चेक ओपन स्पर्धा आपल्या नावे केली आणि या विजयाने सायना नेहवालचा आत्मविश्वास प्रचंड वाढला.
सायना नेहवाल शिक्षण –
मित्रांनो आता जाणून घेऊया सायना नेहवालच्या शिक्षणाच्या बाबतीत सायनाने आपले शालेय शिक्षण “कॅम्पस स्कूल सी.सी.एस.एच.यु हिसार, हरियाणा मधून पूर्ण केले आहे.
शिक्षण आणि खेळ याचा उत्तम समतोल सांभाळत सायना ने शालेय शिक्षणानंतर आपले महाविद्यालयीन शिक्षण हैदराबाद येथील सेट ॲन्स कॉलेज फॉर वुमन येथे पूर्ण केले.
येथे सायना नेहवाल ची शाखेत पदवी संपादन केली पण तोपर्यंत सायना नेहवाल एक स्टार बॅडमिंटनपटू झाली होती. त्यामुळे पुढे सायनाने प्रामुख्याने आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आणि आपल्या शिक्षणाला विराम दिला.saina nehwal information in marathi
सायना नेहवाल आंतरराष्ट्रीय करिअर
नॅशनल लेव्हल वर अप्रतिम कामगिरी केल्यानंतर आता सायना नेहवाल कडून आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोच्च कामगिरीची अपेक्षा होती.
आणि या अपेक्षांवर ती पूर्णपणे खरी ही उतरली ती जगभरातील सर्वोत्तम खेळाडूंची स्पर्धा करत आपला वेगळा ठसा उमटवला.
सायनाने 2006 ला फिलीपिन्स येथे खेळवल्या गेलेल्या आशियाई सॅटेलाईट बॅडमिंटन स्पर्धा जिंकून सर्वांचे लक्ष आपल्याकडे केंद्रित केले.सायना चे पहिले मोठे विजेतेपद होते.
2008 मध्ये सायनाने ओपन स्पर्धा आपले नावे केली.
सायना नेहवालच्या महत्वपूर्ण स्पर्धेत यादीमध्ये – नामांकित बी डब्ल्यू वर्ल्ड चॅम्पियनशिप, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन स्पर्धा, यांचाही समावेश आहे.
2010 मध्ये दिल्ली येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये सायनाने सुवर्ण पदक जिंकले आणि ही कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली.
2012 मध्ये सायना नेहवाल ने लंडन येथे झालेल्या ऑलंपिक स्पर्धेमध्ये कांस्यपदक आपल्या नावे केली आणि बॅडमिंटन मध्ये ही कामगिरी करणारी ही पहिली भारतीय महिला होती.
2018 मध्ये सायनाने आशियाई चॅम्पियनशिप जिंकत आपले सातत्य कायम ठेवले आणि आशिया खंडातील एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून आपले स्थान मजबूत केले.
2015 एप्रिलमध्ये सायना नेहवाल जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते.
सायना नेहवाल विवाह
मित्रांनो सायना नेहवालच्या विवाह 14 डिसेंबर 2018 ला प्रसिद्ध बॅडमिंटनपटु पारूपल्ली कश्यप यांच्याशी संपन्न झाला.
सायना आणि पारूपल्ली आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीपासूनच एकमेकांना ओळखत होते. त्यांची घनिष्ठ मैत्री ही होती. पण काही कालांतराने या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. आणि 14 डिसेंबर 2018 ला या दोघांनी हैदराबाद येथे खाजगी समारंभात लग्नगाठ बांधली.
त्यानंतर हैदराबाद मध्ये त्यांनी मोठा स्वागत समारंभ आयोजित केला होता. आणि या येथे त्यांना आशीर्वादा शुभेच्छा देण्यासाठी कला आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.saina nehwal information in marathi.
सायना नेहवाल आवड –
आवडती जागा – सिंगापूर
आवडता नट – शाहरुख़ खान, महेश बाबु.
आवडती नटी –
आवडते जेवण – आलू पराठा.
आवडत सिंगर –
आवडता चित्रपट –
आवडता खेळाडू – सचिन तेंडुलकर.
सायना नेहवाल पुरस्कार –
सायना नेहवाल ने जिंकलेले काही उल्लेखनीय पुरस्कार –
(अर्जुन पुरस्कार 2009) सायना नेहवाल ने 2009 मध्ये भारतीय सरकारकडून अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
(राजीव गांधी पुरस्कार 2010) सायना नेहवाल ला 2010 मध्ये भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
(पद्मभूषण 2016) सायना नेहवाल ला 2016 मध्ये भारतीय सरकारकडून पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पद्मभूषण हा भारतातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.
सी.एन.एन इंडियन ऑफ द इयर (2009/2015) सायना नेहवाल ला 2009 आणि 2015 मध्ये सीएनएल आयबीएन इंडियन ऑफ द इयर स्पोर्ट्स म्हणून सन्मानित करण्यात आले.
डॉक्टरेट – सायना नेहवालला एस.आर.एम आणि मंगला विद्यापीठ सोबत अनेक प्रतिष्ठित विद्यापीठांनी मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली.
(पद्मश्री पुरस्कार 2010) सायना नेहवाल ला 2010 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पद्मश्री पुरस्कार भारतातील चौथा मोठा नागरी पुरस्कार आहे.