Shri Krishna Janmashtami in Marathi | श्री कृष्ण जन्माष्टमी माहिती | गोकुलाष्टमी बद्दल माहिती.

नमस्कार मित्रानो, आज आपन माहिती घेणार आहोत Shri Krishna Janmashtami in Marathi | श्री कृष्ण जन्माष्टमी माहिती | गोकुलाष्टमी बद्दल माहिती. कृष्ण जन्माष्टमी बद्दल. आपल्याला तर माहितीच असेल भगवान श्रीकृष्णाला आपण लीलाधर, गिरिधर, देवकीनंदन अशा हजारो नावाने ओळखतो. आणि हो महाभारतात कृष्ण भगवान यांनी सांगितलेली गीता हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाची मानली जाते. आणि गीता आपल्याला जगण्याचा मार्ग ह़ी दाखवते.

मान्यता आहे की द्वापरयुगात भाद्रपद महिन्यात कृष्णपक्ष अष्टमीला मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. त्यामुळे आपल्याला शास्त्रात भाद्रपद शुक्ल अष्टमी च्या मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्म साजरा केला जातो. आणि या दिवसाला हिंदू धर्मात असाधारण महत्त्व आहे. संपूर्ण जगामध्ये हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. तसेच भारताच्या ही काही राज्यामध्ये हां सन बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.

श्रीकृष्ण जन्माष्टमी (बांगलादेश) 

मित्रांनो भारताबरोबरच बांगलादेशमध्ये ह़ी कृष्णजन्माष्टमी हिंदुधर्मीय लोक फारच उत्साहाने साजरी करतात. ढाका मधील प्रसिद्ध ढाकेश्र्वरी मंदिरातून श्रीकृष्णाची मिरवणूक काढण्यात येते. आणि ती जुन्या ढाक्यात येऊन समाप्त होते. या पालखीचे सुरुवात 1902 पासून करण्यात आली होती. पण 1948 ला या पालखी प्रथेला थांबवण्यात आले होते. पण बऱ्याच वर्षांनी 1989 ला पुन्हा या पालखी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.

श्रीकृष्ण जन्माष्टमी (नेपाळ) 

मित्रांनो नेपाळमध्ये ही कृष्णजन्माष्टमी फार मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. नेपाळमध्ये 80 टक्के लोकसंख्या ही हिंदू आहे. आणि त्यामुळे भारतानंतर सर्वात मोठ्या प्रमाणात नेपाळमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. येथे जन्माष्टमीच्या दिवशी गीता वाचन, भजन-कीर्तन अशी अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. 

श्रीकृष्ण जन्माष्टमी (फ़िजी)

मित्रांनो फ़िजी मध्ये एक चतुर्थांश लोकसंख्या हिंदू धर्मियांची आहे. त्यामुळे येथे ह़ी मोठ्या प्रमाणात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. येथे जन्माष्टमी ला कृष्णअष्टमी म्हणून ओळखले जाते. आणि फ़िजी मध्ये राहणारे हिंदूंचे पूर्वज उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि बिहार मधल्या असल्याकारणामुळे इथल्या हिंदूंसाठी तो सण अत्यंत महत्वाचा मानला जातो. आणि येथील जन्माष्टमी सन तब्बल आठ दिवस चालतो. या आठ दिवसाच्या दरम्यान ते सर्व भक्त रात्रीचे एकत्र येऊन भजन कीर्तन करतात. गीता वाचन करतात. आणि भगवान श्रीकृष्णाचे गाणे गातात. आणि प्रसादाचे ही वाटप करतात.

जगा नंतर भारतात ही हां सन प्रत्येक राज्यात वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.

श्रीकृष्ण जन्माष्टमी (महाराष्ट्र) 

आपल्याला तर माहितीच असेल महाराष्ट्रात श्रीकृष्ण जन्माष्टमी खूप उत्साहात साजरी करण्यात येते. महाराष्ट्रात या जन्माष्टमी ला गोकुळाष्टमी असे म्हटले जाते. याच दिवशी सर्व स्त्रिया उपवास ठेवतात. आणि मध्यरात्री श्रीकृष्ण जन्म उत्सव साजरा करतात. आणि  कृष्णजन्म झाल्यावर रात्री बारा वाजे नंतर उपवास सोडतात. पण खास करून महाराष्ट्रात सर्वांना आकर्षण असते ते दहीहंडीचे आणि पुणे, मुंबई, नाशिक सारख्या मोठ्या शहरात फार मोठ्या प्रमाणावर दहीहंडीचे आयोजन केले जाते.

श्रीकृष्ण जन्माष्टमी (उत्तर भारत) 

मित्रांनो भारतात सर्वात मोठ्या प्रमाणात जन्माष्टमी उत्तर भारतात साजरी केली जाते. कारण भगवान श्री कृष्णाचा जन्म मथुरा येथे झाला होता. आणि वृंदावन मध्ये श्रीकृष्ण लहानाचे मोठे झाले. आणि या शहरांमध्ये वैष्णव समाज फार मोठ्या प्रमाणात आढळतो.तसेच जन्माष्टमी ला इथील मथुरेच्या मंदिर ला फार मोठ्या प्रमाणात रोशनाई  केली जाते. आणि फार मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. रात्री जागरणाचे कार्यक्रम होतात. आणि भगवान श्रीकृष्णाचे भक्त मिठाई वाटप करतात.

श्रीकृष्ण जन्माष्टमी (गुजरातराजस्थान) 

मित्रांनो गुजरात आणि राजस्थानमध्ये ही जन्माष्टमीचे एक वेगळे महत्त्व आहे. असे म्हटले जाते की गुजरात मधील द्वारका मध्ये भगवान श्रीकृष्ण आणि आपले राज्य स्थापित केले होते. येथेही महाराष्ट्राप्रमाणे मोठ्या प्रमाणात दहीहंडीचे आयोजन केले जाते. त्याला तिथल्या भाषेत “माखन हांडी” म्हणण्यात येते. आणि तेथे ह़ी मंदिरामध्ये नृत्य भजन कीर्तनाचे आयोजन केले जाते. आणि गुजरातच्या काही ग्रामीण भागामध्ये शेतकरी आपल्या बैलगाडी वर श्रीकृष्णाची मिरवणूक काढतात. मोठ्या प्रमाणात गायन, नृत्य आणि भजन कीर्तनाचे आयोजन करतात.

नागपंचमी सना बद्दल माहिती-

भगवान श्रीकृष्णाची जन्म कथा | Shri Krishna Janma Katha

मित्रांनो आता आपण माहिती घेऊ या भगवान श्रीकृष्णाचे जन्म कथेची. तर याची सुरुवात होते देवकी आणि वासुदेव यांच्या विवाहापासून. विवाह संपन्न झाल्यावर देवकी वासुदेवान सोबत माहेरी जाण्यासाठी निघतात. आणि त्याना सोडवण्यासाठी जातो तिचा क्रूर भाऊ राजा कंस.

कंस त्या नगराचा चा खूप मोठा क्रूर असा राजा असतो. रस्त्याने जात असताना आकाशवाणी होते की. “कंस…लवकरच देवकीचा आठव्या पुत्राकडुन तुझा वध होणार आहे” हे ऐकुन राजा कंस रागात देवकीला आणि वासुदेव मला मारण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा वासुदेव त्याला म्हणतो “आम्हाला मारू नका. त्यात आमचा काय दोष. त्या मुलाने अजुन जन्म ह़ी घेतला नाही. मी तुम्हाला वचन देतो जेव्हा हि तो जन्म घेईल. तेव्हा मी त्याला तुमच्यावर जवळ आणून देईल” तेव्हा राजा कंस शांत होतो. पण तो दोघांनाही कारागृहात बंद करतो.

नंतर कालांतराने देवकीला पहिला पुत्र होतो पण राजा कंस त्याला ठार करतो. असं करता करता देवकीच्या सहा मुलांना तो ठार करून टाकतो. नंतर सातव्या मुलाच्या जन्माच्या वेळी वासुदेव त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात यशस्वी होतात. वासुदेव त्याला आपल्या पहिल्या पत्नीकडे त्या मुलाला पाठवतात. आणि राजा कंस कडे निरोप पाठवतात की देवकी ने एका मृत मुलाला जन्म दिला आहे. त्या सातव्या मुलाचे नाव असते वासुदेव.

आता आठव्या पुत्राच्या जन्माची वेळ ही आली होती. राजा कंस ने कारागृहाची सुरक्षा वाढवली. पण तेवढ्यात वासुदेव चे मित्र नंद यांना वासुदेव आणि देवकी यांच्या व्यथेची माहिती मिळते. आणि योगायोगाने नंद ची पत्नी यशोदालाही बाळ होण्याची वेळ आलेली असते.

योगायोगाने देवकीचा आठवा पुत्र होतो. आणि इकडे यशोदा एका कन्येला जन्म देते. त्या आठव्या मुलाचा जन्म होताच. त्या कारागृहात लख्ख प्रकाश पडतो आणि स्वतः भगवान तिथे उपस्थित होतात. आणि वासुदेवला म्हणतात “राजा कंसाचा वध करण्यासाठी माझा जन्म झाला आहे. तू लवकरात लवकर मला नंद जवळ घेऊन जा. आणि यशोदाने आत्ताच एका मुलीला जन्म दिला आहे…तिला येथे आन”

आणि नंतर आपोआप वासुदेव यांच्या हातातल्या बेड्या सुटतात. कारागृहाची दारे उघडली जातात. आणि सर्व सैनिक ही झोपी जातात. वासुदेव बाळाला एका टोकरित घेतात. आणि मित्र नंद कडे निघतात. बाहेर मुसळधार पाऊस चालू असतो. पण वासुदेव यमुना पार करुन गोकुळामध्ये जाण्यास सुरुवात करतात. असंख्य अडचणींवर मात करत वासुदेव गोकुळ मध्ये पोहोचतात.

मित्र नंदकडे पोहोचल्यावर बाळकृष्णाला त्याच्याकडे सुपूर्त करून त्यांची लहान कन्या घेऊन पुन्हा कारागृहात कडे निघतात. त्यानंतर कारागृहात आल्या वर पुन्हा वासुदेवाच्या हातात पुन्हा बेड्या ठोकल्या जातात. कारागृहाचे दरवाजे आपोआप बंद होतात. आणि सैनिकही जागे होतात.

मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून सैनिक राजा कंस कडे जातात. आणि निरोप देतात की देवकीने आठव्या पुत्रला जन्म दिला आहे. मग राजा कंस कारागृहात येतो आणि बघतो तर  देवकीने एका मुलीला जन्म दिलेला आहे. आणि हे पाहून आश्चर्यचकित होतो. तेव्हा देवकी राजा कंस ला म्हणते. “ह्या मुलीला मारू नको…ही मुलगी आहे. ही तुला काय हानी पोहोचणार”

पण राजा कंस देवकी च्या हातातून त्या लहान मुलीला आपल्या कडे घेतो. आणि जमिनीवर आदळन्याच प्रयत्न करताच. ती मुलगी अदृश्य होऊन जाते. कालांतराने राजा कंसला ही गोष्ट कळते की आपला वध करणारा देवकीचा आठव्या पुत्रा ने जन्म घेतलेला आहे. आणि तो गोकुळा मध्ये आहे.

तेव्हा राजा कंस बऱ्याच राक्षसांना भगवान श्रीकृष्णाला मारण्यासाठी पाठवतात. पण भगवान श्रीकृष्ण प्रत्येकाचा वध करतात. आणि काही काळानंतर कंसाला ही आपल्या पापांची शिक्षा शिक्षा देतात. आणि त्याचाही वध करतात. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण जन्म दिवसाला जन्माष्टमी म्हणून साजरी करतात.

मित्रांनो Shri Krishna Janmashtami in Marathi-श्री कृष्ण जन्माष्टमी माहिती- गोकुलाष्टमी बद्दल माहिती. कशी वाटली आम्हाला ज़रूर सांगा. आणि आवडल्यास आपल्या मित्र परिवारा मध्ये नक्की शेअर करा. आपन आपला अमूल्य वेळ दिला…त्या बद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment