Sneha Wagh Biography in Marathi | स्नेहा वाघ जीवन परिचय.

नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील लोकप्रिय टीव्ही शो ज्याचे नाव आहे बिग बॉस मराठी मधील सर्वात चर्चित स्पर्धक स्नेहा वाघ यांच्या जीवना बद्दल. चला तर मग जाणून घेऊया स्नेहा वाघ यांच्या बालपण, कुटुंब, करिअर, आयुष्य यावर ही बरेच काही…Sneha Wagh Biography in Marathi | स्नेहा वाघ जीवन परिचय…चला तर मग सुरू करूया.

Sneha Wagh Family –

मित्रांनो स्नेहा वाघ यांचा जन्म 4 ऑक्टोबर 1987 (रविवार) महाराष्ट्रातील कल्याण या शहरात झाला. स्नेहाच्या वडिलांचे नाव गणेश वाघ तर आईचे नाव दमयंती वाघ आहे. स्नेहा वाघला एक लहान बहिण ही आहे. जिचे नाव रितिका वाघ आहे. आणि मित्रांनो याच वर्षी 2021 मध्ये स्नेहा वाघ यांच्या वडिलांचे कोविड-19 मुळे दुःखद निधन झाले आहे.

Sneha Wagh Educational –

मित्रांनो बोलायचं झालं स्नेहा वाघ यांच्या शिक्षणाबद्दल तर स्नेहा यानी बॅचलर ऑफ सायन्स ची पदवी घेतली आहे. स्नेहाने आपल्या शालेय शिक्षण होली क्रॉस कन्वर्टर स्कूल कल्याण, महाराष्ट्र मधून पूर्ण केल. तर स्नेहाने बिर्ला कॉलेज कल्याण मधून आपली पदवी पूर्ण केली. आणि स्नेहाने अभिनयाचे प्रशिक्षण आणि फिल्म मेकिंग प्रशिक्षण लंडन फिल्म अकॅडमी लंडन इंग्लंड मधून घेतले.

Sneha Wagh Marriage –

मित्रांनो, स्नेहाचे वैवाहिक जीवन तसे फारच कठीण राहिले आहे. स्नेहाच्या आतापर्यंत दोन विवाह झाले आहे. पण दोन्ही विवाह फार काळ टिकू शकली नाही. स्नेहाचा पहिला विवाह मात्र 19वर्षी मराठी अभिनेता अविष्कार दारव्हेकर याच्याशी झाला होता. पण त्यांचा विवाह केवळ दोन वर्षेच टिकू शकला. 2006 मध्ये दोघांनी विवाह केला होता व 2008 मध्ये त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

नंतर 2015 ला स्नेहाने दुसरा विवाह केला इंटिरियर डिझायनर अनुराग सोलंकी सोबत पण विवाह ह़ी जास्त काळ टिकू शकला नाही. मात्र सहा महिन्यात दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. तसा अजूनही त्यांनी घटस्फोट घेतलेला नाहीत. परंतु लवकरच घेणार आहेत. असे स्नेहाचे म्हणणे आहे. आणि सध्या दोन घटस्फोटानंतर नच बलिये तील कंटेस्टंट फैजल खान सोबत स्नेहा डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. पण दोघांनीही ही केवळ अफवा असल्याचे सांगितले आहे.

Sneha Wagh Career –

मित्रांनो बोलायचं झालं स्नेहाच्या करियर (Sneha Wagh Career) विषयी तर स्नेहाला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यामुळे वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी स्नेहाने मराठी नाटकात काम करण्यास सुरुवात केली. नंतर तिने 2004 मध्ये अधुरी एक कहाणी या मराठी मालिकांमधून आपल्या टेलिव्हिजन करिअरची सुरुवात केली.

नंतर तिने काटा रुते कुणाला या मालिकेतील ही आपली अभिनयाची चुणूक दाखवली आणि दोन्ही मालिकेतील तिच्या अभिनयाचीही सर्वांनी फार कौतुकही केले. स्नेहाने आपल्या अभिनयाच्या जोरावर लवकर हिंदी टीव्ही शोमध्येही पदार्पण केले.

तिने हिंदी मध्ये अनेक मालिका केल्या. तिची पहिली मालिका राहिली Imagine TV वरील ज्योती या मालिकेतील प्रमुख भूमिका बजावली. तर SONY Tv वरील प्रसिद्ध शो चंद्रगुप्त मौर्य या मालिकेतही स्नेहाने भूमिका निभावली. आणि सध्या स्नेहा 2021 ला बिग बॉस मराठी 3 मध्ये सहभागी झालेली आहे.

Tv Show –

वर्ष. 

मलिका.

भूमिका.

2009-10

ज्योती.

ज्योती शर्मा.

2012-15

एक वीर की अरदास वीरा

रतन कौर. 

2017

शेर-ए-पंजाब – महाराजा रंजित सिंह. 

महारानी राज कौर.

2018

चंद्रशेखर.

जगरानी तिवारी.

2018-19

चंद्रगुप्त.

महारानी सूरा.

2020

कहत हनुमान जय श्री राम. 

महारानी अंजना.

Sneha Wagh Big Boss Marathi 3 –

महाराष्ट्रातील सर्वात बहुचर्चित रिॲलिटी शो बिग बॉस मराठी 3 ची सुरुवात झालेली आहे. त्यात बरेच स्पर्धे वादग्रस्त असल्याकारणाने याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. या वेळेस स्नेहाची ह़ी इंट्री बिग बॉस मध्ये झालेली आहे. आणि शोमध्ये तिने तिच्या दोन अयशस्वी विवाहाचा उल्लेख केलेल्या कारणाने ही प्रसिद्धीत आली आहे. आणि सोशल मीडियावर स्नेहाची व तिच्या विवाहाची जोरदार चर्चा सुरू आहे. आणि खास करून ही गोष्ट सांगायची तर स्नेहाचा पहिला पति अविष्कार दारव्हेकर ही या बिग बॉस मराठीतील या शोमध्ये स्पर्धक म्हणून घरामध्ये आहे.

Sneha Wagh Favourites –

* आवडता अभिनेता –

* आवडती अभिनेत्री – श्रीदेवी, माधुरी, वहीदा रहमान.

* आवडत जेवण – दाल-राईस, तंदूर-चिकन.

* आवडत स्ट्रीट फ़ूड – पानी पूरी.

* आवडते गाने – ये राते ये मौसम नदी का किनारा.

* आवडता चित्रपट – हम साथ साथ है.

* आवडते होटेल – flora hotel. Worli.

Sneha Wagh Amazing Facts –

– स्नेहा वाघ ही एक ट्रेंड इंडियन क्लासिकल डान्सर सुद्धा आहे. आणि अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी ती डान्सिंग स्कूल उघडण्याच्या तयारीत होती.

– स्नेहा ही फारच धार्मिक आहे व गणपती बाप्पाची फार मोठी भक्त आहे.

– स्नेहाला कार ची फारच आवड आहे आणि तिच्याकडे ऑडी ए4 पांढऱ्या रंगाची कारही आहे.

– अजून स्नेहा वाघला के-पॉप गाणे प्रचंड प्रमाणात आवडतात.

– स्नेहाला फावल्या वेळेत पुस्तक वाचणे आणि चित्रकला करणे याची फार आवड आहे.

– स्नेहा 2016 मध्ये भारतीय गायक O’KGC आणि तरनुम मलिक यांच्या एका हिंदी म्युझिक व्हिडिओ “पुरी पटोला” मध्येही दिसलेली आहे.

 

Leave a Comment