नमस्कार, आज आपण माहिती घेणार आहोत एका अशा पवित्र सणाबद्दल ज्याचं महत्त्व विवाहित महिलांमध्ये असाधारण आहे. हो आम्ही बोलत आहोत वटपौर्णिमा बद्दल म्हणजे वटसावित्री पौर्णिमा बद्दल. चला तर मग जाणून घेऊया वटपौर्णिमा सणाबद्दल थोडीफार माहिती. वटपौर्णिमा संपूर्ण माहिती | Vat Purnima in Marathi. चला तर मग सुरु करूया.
वटपौर्णिमा माहिती –
वटपौर्णिमेला आपल्या महाराष्ट्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. वटपौर्णिमेला आपण वटसावित्री पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखतो. वटसावित्री पौर्णिमेला भारतात महाराष्ट्रासोबत गुजरात आणि उत्तर भारतातील काही भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
वटपौर्णिमा हां सन हिंदू कॅलेंडर नुसार जेष्ठ महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. आणि इंग्रजी कॅलेंडरनुसार वटपौर्णिमा मे किंवा जून महिन्यात येते. वटसावित्री पौर्णिमा हा सण विशेष विवाहित महिला मोठ्या उत्साहात साजरा करतात.
विवाहित स्त्रिया या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कल्याणासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. आणि आपल्या पतीसाठी दिवसभर उपासही पकडतात. या दिवशी विवाहित महिला वडाच्या झाडाला पवित्र असा धागा बांधून परिक्रमा करतात. आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात.
वटपौर्णिमा पूजा कशी करावी ?
वटसावित्री पौर्णिमा पूजा करण्याची एक विशिष्ट विधी आणि परंपरा आहे चला तर मग जाणून घेऊया. आपण सगळ्यात पहिले जिथे पूजा करणार आहोत म्हणजे वडाच्या झाडाजवळ चांगली स्वच्छता करून घ्यावी.Vat Purnima in Marathi.
पूजेसाठी लागणारी सामग्री कुंकू, फुले, अगरबत्ती, तांदूळ, हळद, मोळी किंवा कलव चा धागा, कलश, फळे, दिवा, नारळ, मिठाई. ही सगळी पूजा सामग्री जमा करून घ्यावी.
वटवृक्षाची पूजा – सर्वप्रथम गणपती बाप्पाची प्रार्थना करावी आणि पूजा सुरू करण्यासाठी त्यांचे आशीर्वाद घ्यावे. नंतर दिवा आणि अगरबत्ती झाडाभोवती लावावी. वडाच्या झाडाला धागा बांधावा. झाडाला कुंकू हळद तांदूळ अर्पण करावे. प्रार्थना करत वडाच्या झाडाला फुले अर्पण करावी आणि त्यासोबत वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालावी.वटपोर्णिमा संपूर्ण माहिती
महिलांनी ह्या दिवशी उपास ठेवून शिव-पार्वतीकडेही दीर्घकाळ टिकणाऱ्या वैवाहिक जीवनासाठी आणि जोडीदाराच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करावी.
⇒ श्री कृष्ण जन्माष्टमी माहिती –
वटपौर्णिमा महत्व –
चला तर मग जाणून घेऊया वटपौर्णिमेचे महत्त्व आणि त्याची कारणे –
विवाह बंधाचे प्रतीक – वटसावित्री पौर्णिमा नवरा आणि बायको मधील अतूट आणि पवित्र भक्ती आणि प्रेम दाखवते. वैवाहिक जीवन यशस्वी करण्यासाठी आवश्यक असलेल्या समर्पणाची आठवण करून देणारा वटपौर्णिमा हा सण आहे.
दीर्घायुष्यासाठी प्रार्थना – या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. आणि दिवसभर उपवास पकडतात त्यामुळे त्यांचे हे नाते अधिक घट्ट होण्यास मदत मिळते.
झाडांबद्दल आदर – वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात त्याला प्रदक्षणा घालतात. आणि मनोभावे आणि आदराने वडाच्या झाडा ला पवित्र असे धागे बांधतात. आणि एक प्रकारे कृतज्ञतेची भावना वडाच्या झाडासाठी व्यक्त करतात.
सावित्री आणि सत्यवानाची कथा – वटसावितेची पौर्णिमेला विवाहित महिला महाभारतातील सावित्री आणि सत्यवान यांच्या पौराणिक कथेची आठवण करतात. कसे सावित्रीने आपल्या भक्ती आणि दृढ़ निश्चयाने आपल्या पतीचा जीव वाचवला होता.Vat Purnima in Marathi.
सामाजिक महत्त्व – वटपौर्णिमेच्या दिवशी सर्व विवाहित महिला एकत्र येतात. आपल्या विचारांची अनुभवांची देवाणघेवाण करतात. अनेक महिला उत्साहाने आनंदाने सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करतात. त्यामुळे महिलांमध्ये सामाजिक महत्त्व वाढते.
वटसावित्रीची कथा / वटपौर्णिमा कथा –
चला तर मग जाणून घेऊया वटसावित्री पौर्णिमाची पौराणिक कथा – एकेकाळी एका राज्याचा अश्वपति नावाचा राजा होता. अश्वपती ला सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि सद्गुनी अशी सावित्री नावाची मुलगी होती. आणि सावित्रीला ही एका श्रेष्ठ पुरुषाशी लग्न करण्याची इच्छा होती.
सावित्रीची वडील अश्वपतिला दैवी चमत्कारामुळे कळाले होते की सावित्री चा पती सत्यवान हा होणार आहे. तो दयुमत सेन नावाच्या आंधळ्या राजाचा मुलगा आहे. आणि शापामुळे सत्यवान ही लवकर मृत्यू पावणार आहे. तरीही सावित्री सत्यवानाशी विवाह करण्यासाठी हट्ट करते.आणि त्याच्याशी विवाह करते.
काही काळानंतर सत्यवान जंगलामध्ये झाडे तोडत असताना त्याला अशक्तपणा येऊन तो बेशुद्ध पडतो. सावित्रीला फार चिंता वाटू लागते आणि तिला एका साधू द्वारे कळते की सत्यवानाचे आयुष्य आता संपणार आहे.
आपल्या पतीचा जीव वाचवण्यासाठी सावित्री उपास आणि तीव्र तपस्या करण्याचा निर्णय घेते. सावित्री आपल्या पतीसोबत जंगलामध्ये जाऊन तपस्या आणि अपार कष्ट सहन करते.वटपोर्णिमा संपूर्ण माहिती
काही कालांतराने मृत्यूचा देवता यमदेव सत्यवानांचे प्राण घेण्यासाठी प्रगट होतो. यमदेव सत्यवान प्राण घेउन निघतात. इतक्या सावित्री ही सोबत येण्याचे हट्ट धरते.
सावित्री चे प्रेम,भक्ति,निष्ठा बघून यमदेव तिला पती सोडून 3 वरदान मागन्यास सांगतात.
तिथे सावित्री त्याना 3 वर असे मागते की – माझ्या सासर्याची दृष्टी पुन्हा यावी, माझ्या सासर्यानी हरलेली राज्य त्यांना परत भेटावी, मला एक पुत्र हवा कारण सत्यवानाचा वंश पुढे चालावा. यमदेव तिला तिन्ही वर देतात आणि आपल्या शब्दत अड़कतात. आणि नाइलाज ने यमदेवाला सत्यावांचे प्राण वापस करावे लागतात.
या कथेतून सावित्रीची भक्ती, निष्ठा आणि दृढ नसल्याचे बळ, चातुर्य दिसून येते. पतीच्या जीवनाचे रक्षण करण्यासाठी तिने केलेले कठोर प्रयत्न विवाहित महिलांसाठी खरंच एक प्रेरणादायी कथा आहे.